Latest News

6/recent/ticker-posts

शासनाचे नियम पाळून आडत बाजार चालू करणार- अशोकराव पाटील निलंगेकर

शासनाचे नियम पाळून आडत बाजार चालू करणार- अशोकराव पाटील निलंगेकर



निलंगा(प्रतिनिधी) कोरोना विषाणूमुळे कृषी उत्पन्न बाजार समिती लॉक डाऊनच्या काळात बंद करण्यात आलेल्या होत्या, परंतु लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख,जिल्हाधिकारी जी. श्रीकांत,जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र माने आणि जिल्हा निबंधक सहकारी संस्था लातूर यांची संयुक्त बैठक होऊन लातूर जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे यापुढे कृषी उत्पन्न बाजार समिती निलंगा ही चालु होणार असून शासनाचे नियम पाळून आडत बाजार चालू करणार असे निलंगा कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती अशोकराव पाटील निलंगेकर यांची पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले.यावेळी सचिव संतोष पाटील, अनिल अग्रवाल, बाजार समिती चे संचालक संजय वारद,नाईकवाडे आदी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments