Latest News

6/recent/ticker-posts

देवणी तालुक्यातील गुरनाळ येथे अँटी कोरोना फोर्स

देवणी तालुक्यातील गुरनाळ येथे अँटी कोरोना फोर्स


 


देवणी:(प्रतिनिधी:विक्रम गायकवाड) जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या सूचनेनुसार गावागावातून अँटी कोरोना फोर्स ची स्थापना करण्यात येत आहे. त्यानुसार देवणी तालुक्यातील गुरनाळ येथे अँटी कोरोना फोर्सची स्थापना करण्यात आली. 
गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे. गावात येणाऱ्या मुख्य रस्त्यावर चेक पोस्ट ची निर्मिती केली आहे. गावातून  विनाकारण बाहेर गावाहून येणाऱ्यांना विचारणा करणे मास्क न घालून येणाऱ्याना२०० ₹ व सार्वजनिक ठिकाणी थूंकणारे व्यक्तीस ५०० ₹ दंड आकारण्यात येत आहे. यासाठी गावातील प्रदीप दिवाण,महादेव स्वामी,बाळू म्हेत्रे,अंबादास बागवाले,ज्ञानेश्वर हसनाळे,दत्ता अंकुश,बागवाले कृष्णा,माने कृष्णा,जबाडे योगेश,चापटे सतिश,बोरोळे महादेव,बागवाले दत्ता,नीळकंठ बागवाले,गोविंद बागवाले,किशोर बागवाले,गोविंद चापटे,पांडुरंग बिरादार,परमेश्वर बोरोळे,कृष्णा हाडबे,माधव भरतमाने,सुनीलचापटे,सादिकशेख,जावेद शेख,चेतन माने,ओमकार हसनाळे,जावेद सय्यद,वशीम नबीसाब हे युवक अँटी कोरोना फोर्स म्हणून कार्य करीत आहेत.


Post a Comment

0 Comments