केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची लातूरला कोरोना बचावासाठी मदतीची दुसरी फेरी
लातूर:(सतीश तांदळे) लातूरच्या सार्वजनिक दसरा महोत्सव समिती, छात्र फाउंडेशन आणि ट्रेसर्स असोसिएशनच्या (कृषी विभाग) वतीने करण्यात आलेल्या मागणीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत केंद्रीय ग्राहक संरक्षण तथा अन्नपुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दुसऱ्यांदा ३५००० मास्क आणि १००० सॅनिटायजरच्या बाटल्या विनाशुल्क उपलब्ध करून दिल्या आहेत.
यापूर्वी दानवे यांनी लातूर शहर, ग्रामीण भागातील जनतेसाठी २५००० मास्क आणि ६०० सॅनिटायजर बाटल्या पुरविल्या होत्या. या साहित्याचे वितरण जिल्हा प्रशासनाच्या मदतीने शहर आणि ग्रामीण भागात करण्यात आले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या या साहित्यांची ग्रामीण भागातील मागणी लक्षात घेता दानवे यांनी काल अतिरिक्त ३०००० मास्क आणि १००० सॅनिटायजर बाटल्यांचा पुरवठा लातूरसाठी केला आहे. या साहित्याचे वाटप उद्यापासून लातूर ग्रामीण भागात जिल्हा प्रशासनाच्या मदतीने करण्यात येणार असल्याची माहिती प्रकाश पाटील वांजरखेडकर, राजकुमार कलमे आणि व्यंकटेश हालिंगे यांनी दिली आहे.
केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांनी लातूरला केलेल्या अतिरिक्त मदतीबद्दल प्रकाश पाटील यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी आभार मानले आहेत.
0 Comments