पत्रकार, फोटोग्राफर यांचा तात्काळ सुरक्षा विमा काढावा
वसुंधरा प्रतिष्ठानचे मुख्यमंत्र्यांना निवेदन; संरक्षण किट देण्याचीही मागणी
लातूर:(प्रतिनिधी) कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर पत्रकार, छायाचित्रकार आपल्या जीवाशी खेळून लोकांपर्यंत बातम्यांच्या माध्यमातून माहिती देत आहेत. सर्व पत्रकार, छायाचित्रकार यांचा सुरक्षा विमा काढावा आणि त्यांना सुरक्षा किट उपलब्ध करून द्यावी अशी मागणी वसुंधरा प्रतिष्ठानने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ई-मेल द्वारे हे निवेदन पाठविण्यात आले.
कोरोना महामारी आजरात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस, सफाई कामगार आणि इतर सर्वच जीवनाश्यक वस्तू पुरविणारे जसे आपल्या जीवाशी खेळून इतरांना सुरक्षा आणि सेवा देत आहेत त्याप्रमाणेच पत्रकार आणि छायाचित्रकार बातम्यांच्या माध्यमातून माहिती देऊन जनजागृती करीत आहेत. पत्रकार आणि छायाचित्रकार बातम्या संकलन करण्यासाठी सदैव बाहेरच असतात. त्यांनाही सुरक्षा देण्याची गरज आहे. त्यामुळे मा. मुख्यमंत्री यांनी पत्रकार आणि छायाचित्रकार यांचा सुरक्षा विमा काढून त्यांना संरक्षण किट द्यावी अशी मागणी वसुंधरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.योगेश शर्मा यांनी या निवेदनात केली आहे.
0 Comments