Latest News

6/recent/ticker-posts

कोरोना सावट: सोशल डिस्टंसिंग पाळत पर्युषण पर्व साजरे

कोरोना सावट: सोशल डिस्टंसिंग पाळत पर्युषण पर्व साजरे



लातूर:(प्रतिनिधी) पालखी सोहळा जैन धर्मामध्ये पर्युषण पर्वाला खूप महत्त्व असते. वर्षभर केलेल्या कर्माचे फळ पदरात पाडून घेण्याचे संस्कार म्हणजे पर्युषण पर्व.


          यंदा covid-19 च्या प्रादुर्भावाने राज्यातील मंदिरे बंद असल्याने पर्युषण पर्वा वरती दुःखाचे सावट होते.


           लातुरातील जैन मंदिरे बंद ठेवावीत असे शासकीय आदेश असल्याने व पोलिसांच्या सूचना मंदिर ट्रस्टी यांना आल्याने लातुरात पर्युषण पर्व मंदिरात साजरा झाला नाही .


         परंतु काही समजदार श्रावक श्राविका यांनी सोशल डिस्टंसिंग पालन करून हत्ते नगर निवासी सौ सुमन प्रकाश जी महाजन यांच्या निवासी पर्यूषण पर्वाचे दहा दिवस साजरे केले यात प्रति दिवस नैमित्तिक पूजा भगवंताचा अभिषेक व व विधान व सायंकाळची आरती चे आयोजन होते 


दिनांक ६ नोव्हेंबर रोजी भगवंताची पालखी हत्ते नगर परिसरात सोशल डिस्टंसिंग चे भान ठेवून काढण्यात आली.


         अल्पोपहार व प्रसादाने पालखीची सांगता रविवार दिनांक ६ सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता करण्यात आली याप्रसंगी सुमारे ५० श्रावक श्राविका उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments