Latest News

6/recent/ticker-posts

रामभाऊ तिरुके यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर

रामभाऊ तिरुके यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर



युवा ग्रुप व ग्रामपंचायतीचे आयोजन; ५१ दात्यांनी केले रक्तदान


सताळा(बु):(ता. उदगीर) माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती व मराठवाडा साहित्य परिषदेचे सदस्य रामचंद्र पंढरीनाथ तिरुके (रामभाऊ) यांच्या ४९ व्या वाढदिवसानिमित्त दुष्यंत तिरुके, युवा ग्रुप व ग्रामपंचायत सताळा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर घेण्यात आले. गावातील व परिसरातील ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. 


      सरपंच शिवलिंग जळकोट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाचे तालुकाअध्यक्ष बस्वराज अण्णा रोडगे, अंबरखाने रक्तपेढी उदगीरचे डॉ. बी.एम. शेटकार, स्वातंत्र्य सैनिक पंढरीनाथ तिरुके, कमलेश पेटे, शंभू उमरगा सरपंच वसंत पाटील, वायगावचे सरपंच अविनाश बेळकुंदे, डिग्रसचे सरपंच श्रीकांत कोंपले, सुमठानचे सरपंच लक्ष्मण बिरादार, उपसरपंच अरुणाताई देशपांडे, पोलीस पाटील यशवंत पाटील, सोसायटीचे चेअरमन पद्मसिंह पाटील,भाजपा तालुका उपाध्यक्ष सचिन सुडे, माजी सरपंच शंकर तीरकोळे, माजी चेअरमन लक्ष्मण बिरगे उपस्थित होते. 


     वाढदिवसाच्या निमित्ताने परिसरातील डिगोळ, बावलगाव, सुमठाणा, वायगाव, शंभू उमरगा, डिग्रस येथील ५१ रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी काशिनाथ पाटील, बाबुराव मद्दे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र तोडगीरे, अंगद कोमटवाड, हरिभाऊ तोडगीरे, शिवाजी बस्तापुरे, भानुदास गुडे, अमृत जळकोटे, जगन्नाथ जळकोटे, संजू पांचाळ, सुभाष सिंदाळकर व युवा ग्रुपच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.


Post a Comment

0 Comments