पावसा अभावी सोयाबीन पिकाचा होतोय' पाचोळा !
{बाबुराव आगलावे}
भादा: सुरूवातीला ऊंट अळी, लष्करी अळीनंतर लातूर जिल्ह्यात आता पावसाने मोठी उघङीप दिल्याने सोयाबीनच्या मागे आता 'उन्हाच्या लाहीचा भुंगा लागलेला आहे. त्यामुळे पावसा अभावी सोयाबीन पिकाचा पाचोळा होताना दिसत आहे.
लातुर जिल्ह्यातील भादा व परिसरात गेल्या काही दिवसा पासुन पावसाने मोठी उघङीप दिल्याने शेतक-यासाठी नग्दी असणारे पिक सोयाबीनने माना टाकल्या आहेत. सुरूवातीला उंट अळी, त्यानंतर लष्करी अळी व आता पावसाच्या वक्रदृष्टीने सोयाबीन पिकाच्या उत्पादनावर मोठा परिणाम होणार असे दिसते. त्यामुळे शेतक-याचे अर्थिक गणित बिघङू शकते. विशेष म्हणजे काही ठिकाणी भर पावसाळ्यातही अनेक विहीरी अद्यापही तळातच आहेत त्यामुळे सध्या तरी मोठ्या पावसाची नितांत गरज आहे. येत्या काही दिवसात मोठा पाऊस नाहीच पङला तर शेतक-यांच्या हातात सोयाबीनचा 'पाचोळा'च येईल यात शंका नाही.
0 Comments