कोविड कॅप्टन ग्रुप शिक्षणामुळे विद्यार्थी गिरवु लागले धडे
निटूर:(प्रतिनिधी) कोविड कॅप्टन ग्रुप पध्दत शिक्षनामुळे चार ते पाच विद्यार्थी ग्रुप पध्दतीने सोशल डिस्टेन्सच्या नियमा प्रमाणे तोंडाला मास्क बांधुन विद्यार्थी धडे गिरवु लागले आहे. निटूर येथील जिल्हा परीषद प्रशालामध्ये ग्रुप-ग्रुपने विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यावेळी बोलताना शिक्षक बी.एस.सोनटक्के म्हणाले की, एक ग्रुप झाला की दुसरा ग्रुप, दुसरा झाला की तीसरा ग्रुप प्रत्येक ग्रुपला कॅप्टन करून नियमावर बोट ठेऊन काळजी पुर्वक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शिक्षण पध्दतीमुळे कोरोनामुळे थांबलेले शिक्षण काळजीपुर्वक चालु आसल्यामुळे पालकात समाधान व्यक्त होत आहे.
शिक्षक दिन
डॉ. राधाकृष्ण सर्वपल्ली यांच्या प्रतीमेस माजी केंद्रीय रेल्वे बोर्डाचे समीती सदस्य आर. एच.सोनी यांचा हास्ते पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी शिक्षक, शिक्षका, शिक्षकोत्तर कर्मचाराचा निलंगा पंचायत समीती गटसाधन केंद्राचे गायकवाड यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
0 Comments