Latest News

6/recent/ticker-posts

व्यापारी संघटनेच्या अवाहनाला औसा शहरात संपूर्ण प्रतिसाद शहर ठेवले कडकडीत बंद

व्यापारी संघटनेच्या अवाहनाला औसा शहरात संपूर्ण प्रतिसाद शहर ठेवले कडकडीत बंद



औसा:(तालुका प्रतिनिधी बी.जी.शेख)दि.६ - औसा शहरात काल व्यापारी संघटनेने अवाहन केले होते त्या अहवानाला शहरातील व्यापारी वर्गाने पाठिंबा देत शहर बंद ठेवले.


कोरोना सारख्या महामारीला रोखण्यासाठी येथील व्यापारी वर्गाने सर्व अस्थापने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता, त्या निर्णयाचे स्वागत करत शहरातील व्यापारी वर्ग व जनतेने पूर्ण पाठिंबा देत शहर बंद ठेवले.


शहरात दररोज कोविड-१९ रुग्ण  वाढत असल्याने कुठेतरी आळा बसावा या गोष्टीसाठी शहरात गर्दी निर्माण होऊ नये यासाठी आठवड्यातील एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी वर्गाने घेतला होता. यापूर्वी अशा बंदीचे अवाहन अनेकांनी केले मात्र त्याला इतका प्रतिसाद मिळाला नव्हता जो आज शहरात दिसून आला.


Post a Comment

0 Comments