लातूर–नांदेड महामार्गाच्या दुरुस्तीसाठी गडकरींना साकडे
खासदार श्रृंगारे यांनी दिले निवेदन
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे शिस्तप्रिय मंत्री आहेत. त्यांच्या कालावधीत देशभर रसत्यांची दर्जदार कामे झाली आहेत. लातूर-नांदेड राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरवस्था दूर करण्यासाठी ते निश्चित लक्ष घालतील असा विश्वास लातुरकरांनी व्यक्त केला आहे.
चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) लातूर-नांदेड राष्ट्रीय महामार्गाची ओळख त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे मिटत आली असून खड्ड्याने या महामार्गाची झालेली चाळण पहाता याला महामार्ग म्हणावे की पाणंदरस्ता असा प्रश्न नागरीकांना पडला आहे. वाहनधारकांची कसरत अन अपघातांची मालिका पाहता या महामार्गाची तातडीने दुरुस्ती व्हावी यासाठी खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना निवेदनाद्वारे साकडे घातले आहे.
लातूर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील लातूर ते अहमदपूर या मार्गात मार्गात खड्डेच खड्डे पडले असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या मार्गावरुन वाहने मार्गस्थ करणे कसरतीचे अन जीव धोक्यात टाकणारे झाल्याने नागरीक अन वाहनचालक धास्तावले आहेत. एवढे होऊनही संबधीत प्रशासन गप्पच असल्याने त्यांच्या प्रती नागरीकांतून विविध माध्यामातून रोष व्यक्त केला जात आहे. अनेक पक्ष व संघटनांनी अनोखे आंदोलने करुन प्रशासनाचे या प्रश्नी लक्ष वेधण्याचा प्रयत्नही केला आहे. समाजमाध्यमावरही मार्मिक संवाद अन छायाचित्रे टाकण्यात आली असून यातुनही परस्थितीचे गांभिर्य दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे. या महामार्गावर नित्याने हजारो वाहनांची वर्दळ असते. अनेक महानगरे व राज्यांना जोडणारा हा मार्ग आहे. तथापि या मार्गावर खड्डेच खड्डे पडले आहेत. दोन ते अडीच फुट खोल व विस्तारानेही मोठे असलेल्या या खड्ड्यांनी पावसाचे पाणी थांबत आहे. खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने वाहने खड्डयात पडून अपघात होत आहेत. यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. बरेच जण अपघातामुळे अपंग झाले आहे. दरम्यान हा प्रश्नाकडे खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी लक्ष पुरवले असून त्यांनी केंद्रीय रस्ते विकास व वाहतुकमंत्री नितीन गडकरी यांना निवेदन दिले आहे. राष्ट्रीय माहामार्ग ३६१ तुळजापूर, औसा, लातूर, चाकूर, अहमदपूर व नांदेड हा रस्ता एम. ई. पी. या कंपनीस चौपदरीकरणास देण्यात आल्याचे समजते. रस्ता बांधकाम कालावधीत तो सुस्थितीत ठेवण्याची जबाबादारी संबधीत गुत्तेदाराची आहे. या मार्गाच्या झालेल्या दूरवस्थेमुळे कित्येक लोकांना प्राण गमवावा लागवला आहे. या मार्गाची दुरवस्था व त्यावरील वर्दळ पहाता या प्रकरणी आपण लक्ष घालून संबधीतास खड्डे भरुन रस्ता सुस्थितीत व वाहतुक योग्य ठेवण्याचे आदेश करावेत, अशी विनंती केली आहे.
0 Comments