मुस्लिम आरक्षण शिक्षण संरक्षण या मागण्यांसाठी निलंगा येथे उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना निवेदन
निलंगा:(प्रतिनिधी/इरफान शेख) महाराष्ट्रात मुस्लिम समाज सर्व स्तरावर अतिशय मागास झाला आहे जसे की सच्चर समिती, मोहमद रहेमान समिती आणि रंगनाथ मिश्रा आयोग यांनी सखोल अभ्यास चौकशी करून आप आपापल्या अहवालात सादर केले आहे व संविधानानुसार आरक्षण धर्माच्या आधारावर देता येत नाही मुस्लिम हा इस्लाम धर्माचा हा एक समूह आहे, तो धर्म नाही गरीबीचा विचार केला तर अर्ध्यापेक्षा जास्त मुस्लिम जनता दारिद्र्य रेषेखाली आहे व काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने ५% आरक्षण दिले होते पण त्याचा पाठपुरावा व्यवस्थित झालं नाही आरक्षण टिकले नाही आताच्या महाविकास आघाडी सरकारने तर मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी सौदागर यांनी केली आहे. यावेळी उपस्थित टिपू सुलतान संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुजीब सौदागर, सबदर कादरी, झाकीर शेख, नईम खतीब आदी जण उपस्थित होते.
0 Comments