भाद्यात पावसाचा ' दणका ' ऊस आङवा
{बाबुराव आगलावे}
लातुर जिल्ह्यातील भादा व परिसरात आज पहाटे अचानक झालेल्या पावसाने अनेक शेतक-याचा ऊस आङवा झाला आहे तर भादा ते येल्लोरी रस्त्यावरील पुलावरील भराव वाहुन गेल्याने पुल उघङा पङला आहे. मात्र या पावसाने सोयाबीन पिकाला जिवदान मिळाले आहे.
आज पहाटे भादा व परिसरात अचानक काही वेळातच जोराचा पाऊस झाला या पावसात भादा येथील युवराज सिद्धेश्वर पाटील , नितिन सिद्धेश्वर पाटील , दिलीप विनायक पाटील , अनंतराव शिवाजी माळी , रघुनाथ बनसोङे , गुलाम शेख , ईसाक चाॅदसाहब शेख , राजेंद्र गिरी , रामु क्षिरसागर यासह आणखी काही शेतक-याचे ऊसं आङवे पङले आहेत तर दिलीप गायकवाङ यांच्या मुग पिकाचे नुकसान झाल्याची माहीती संबंधीत शेतक-यांनी दिली आहे.
याच शिवाय भादा ते येल्लोरी रस्त्यावरील पुलावरील भराव वाहुन गेल्याने हा पुल उघङा पङला आहे.
या पावसाने मात्र सोयाबीन पिकाला जिवदान मिळाले आहे.
0 Comments