घरकुलाच्या थकित हप्त्यासाठी औसा नगरपालिके समोर धरणे आंदोलन
औसा:(तालुका प्रतिनिधी बी.जी.शेख)दि.८- आज औसा शहरातील प्रधानमंञी आवास योजने खाली पाञ ठरलेल्या २४५ लाभार्थी ना थकीत हफ्त्या ची नीधी त्वरीत द्यावा या प्रमुख मागणी साठी कडक उन्हात ४ तास औसा नगर परीषद समोर धरणे आदोलन करन्यात आले.
थकित हप्त्यासाठी नगरपालिका पाठपुरावा न केल्यामुळे हे सर्व हप्ते थांबले असल्याचा आरोप यावेळी या धरणे आंदोलनाचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते खुनमिर मुल्ला यांनी म्हटले आहे .
या आंदोलनाला येथील थकीत हप्ते असलेले सर्व लाभार्थी उपस्थित राहणार होते .मात्र फक्त चार लोकांना धरणे आंदोलनात सहभागी होण्याची परवानगी पोलीस कार्यालयाकडून मिळाल्यामुळे कमी लोकांत हे धरणे आंदोलन पूर्ण करण्यात आले.
शासन व प्रशासनाने दखल ना घेतल्यास पुढिल काळात तीव्र आंदोलन करण्यत येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते मुल्ला यांनी इशाराच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. या आंदोलना ला ञस्त लाभार्थी सह,शिवसेना महिला आघाडी नेत्या जयश्रीताई उटगे, नगर सेविका मंजुषाताई कसबे जयराज जी कसबे व कैकाडी महासंघा चे कार्यध्यक्षलिमराज जाधव सह खाजाभाई युवा मंच चे समर्थन मिळाले.
0 Comments