Latest News

6/recent/ticker-posts

औसा पालिकेचे मलिद्याच्या कामाकडेच लक्ष, मूलभूत सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष

औसा पालिकेचे मलिद्याच्या कामाकडेच लक्ष, मूलभूत सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष



औसा:(जिल्हा प्रतिनिधी बी.जी.शेख)दि.२५ - औसा नगरपालिका लातूर जिल्ह्यामध्ये स्वच्छतेचा पुरस्कार प्राप्त असलेली नगरपालिका आहे. वरवर स्वच्छतेचा पोतरा थापणाऱ्या नगरपालिकेची खरी परिस्थिती गल्लीबोळात फिरत असताना दिसून येतेे.मलीदेच्या कामाकडे पालिकेचे लक्ष असल्याने मूलभूत सुविधा पुरविण्यात सपशेल अपयशी ठरली आहे. पावसाळा सुरू झाला तेव्हापासून नगरपालिकेकडे नगरसेवकांच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक वेळा व्यवस्थित रस्ते करून देण्याची मागणी करण्यात आली.मात्र कधी रॉयल्टी ची अडचण सांगून तर कधी प्रशासकीय अडचणी मांडुन हा विषय लांबणीवर टाकण्यात आला आहे. पावसाळा संपत आलेला असतानादेखील ज्या ठिकाणी जाता येता येत नाही,


अशा ठिकाणी कमीत कमी मुरुम टाकण्याची तसदी पालिका घेत नाही. या सर्व परिस्थितीची जाण नगराध्यक्ष यांना असून देखील त्यांचे लक्ष पैशाच्या कामाकडे जास्त असल्याचे चर्चिले जात आहे. एक हाती सत्ता असतानादेखील योग्य ते निर्णय होत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. या सर्व कारणांमध्ये नगरपालिकेचे मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्यामध्ये योग्य ताळ मेळ नसल्याचेही बोलले जात आहे. अंतर्गत रस्त्यावर फिरत असताना फिरणार्‍यांना असे वाटते की पालिकेला स्वच्छतेचा पुरस्कार देणारे मॅनेज केलेले होते की काम चांगले होते असा प्रश्न उपस्थित करत आहेत.


Post a Comment

0 Comments