निलंगा विधानसभा मतदार संघातील लोकप्रतिनिधीचे मतदार संघाकडे दुर्लक्ष- अशोकराव पाटील निलंगेकर
निलंगा:(शहर प्रतिनिधी/इरफान शेख) विधानसभा मतदारसंघातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे व निलंगा शहराची अवस्था खूप बिकट झाली असून लोकप्रतिनिधी कुठे आहेत असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांनी उपस्थित केला .
पत्रकार परिषदेत विविध विषयावर चर्चा करण्यात आली मागील तीन दिवसात प्रचंड अतिवृष्टी होऊन मतदारसंघातील तिन्ही तालुक्यात शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात शंभर टक्के नुकसान झाले आहे निलंगा तालुका लातूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आढावा घेतला असून नुकसानीची माहिती जिल्हयाचे पालकमंत्री अमित देशमुख यांना दिली आहे हाताशी आलेले पीक गेल्याने शेतकरी हताश झाले आहेत मा.अशोकराव पाटील निलंगेकर यांनी शेतकऱ्यांचा पीक विमा तात्काळ मिळावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा केली आहे या पत्रकार परिषदेत उपस्थित काँग्रेसचे युवा नेते अभय साळुंके ,निलंगा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजयकुमार पाटील ,शिरूर अनंतपाळ तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रभाकर बंडगर व आदी जण उपस्थित होते .
0 Comments