पशुपालकांनो सावधान ! जनावरांना होतेय लंम्पीस्कीनची लागण
शेतक-यांना चिंता धोधो पावसात कसे फिटेल रीन ? त्यातच जनावरांना आता लम्पीस्कीन; पशुपालकांनी दक्ष रहाणे गरजेचे !
{बाबुराव आगलावे}
भादा : गेल्या काही दिवसा पासून सोयाबीनच्या मागे लागलेले नैसर्गिक संकट शेतक-यांना अस्वस्थ करत असतानाच जनावरात आता लम्पीस्कीन नावाच्या रोगाची लागण होण्यास सुरुवात झाल्याने पशुपालकात चिंता आणी धास्तीचे वातावरण आहे.
आज भादा येथे या रोगाची लागण असलेले काही जनावरे आढळून आल्याने शेतक-यांना आता आप आपल्या जनावरांची काळजी घ्यावीच लागणार आहे. या रोगामुळे बाधीत जनावरांच्या मानेवर , पायावर , व शरीराच्या इतर भागावर साधारण सुपारीच्या आकाराच्या गाठी दिसुन येत आहेत तसेच जनावराच्या चारा खाणे आणी पाणी पिण्याच्या प्रमाणातही बदल जाणवतो. अशा जनावरांना इतर जनावरा पासुन अलिप्त ठेवणे हा एक पर्याय आहे. भादा येथील काही जनावरात आज हि लक्षणे आढळून आल्याने शेतक-यांना आता नव्या चित्तेने ग्रासले आहे. या आजाराच्या कचाट्यातुन आपले पशुधन वाचवण्यासाठी प्रशासनाने आता लसीकरणाची तात्काळ सोय करावी अशी मागणी पशुपालकातुन होत आहे.
लम्पीस्कीन या रोगापासुन जनावरांचा बचाव करण्यासाठी प्रशासनाने तात्काळ याचे गांभीर्य ओळखुन लसीकरणाची सोय करावी . अगोदरच सोयाबीन पिकावर नैसर्गिक संकट आले आहे त्यात आणखीनच भर या रोगामुळे पङली आहे . यामुळे शेतकरी चिंतीत झाले आहेत. म्हणुन प्रशासनाने तात्काळ यावर औषध उपलब्ध करून द्यावे .
अशी मागणी येथील शेतकरी राम पाटील व इतरांनी केली आहे.
0 Comments