निलंगा येथे सकल मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने घंटा नाद आंदोलन
निलंगा:(शहर प्रतिनिधी/इरफान शेख) मराठा समाजाच्या आरक्षणाप्रश्नी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रात आमदार व खासदार यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून
आज रविवारी निलंगा येते आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने घंटा नाद आंदोलन करण्यात आले लातूरचे माजी पालकमंत्री तथा आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांना सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले. शहरांमध्ये मराठा आरक्षणासाठी स्थानिक आमदाराच्या घरावर घंटा नाद मोर्चा मध्ये महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांनी सहभागी नोदंवून स्थानिक आमदार मार्फत मराठा समाजाचा मागण्या शासन दरबारी लवकर मांङाव्यात व आरक्षणासाठी कायदेशीर कार्यवाही करुन लवकरत लवकर आरक्षण लागू करावे यावेळी मोठ्या प्रमाणावर समाज बांधव उपस्थित होते.
0 Comments