Latest News

6/recent/ticker-posts

पावसामुळे सोयाबीनची काढणी 'ब्रेक' के बाद; अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांचे सोयाबीन काढतानाच भिजले

पावसामुळे सोयाबीनची काढणी 'ब्रेक' के बाद; अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांचे सोयाबीन काढतानाच भिजले



{बाबुराव आगलावे}


भादा: आज दुपारी भादा व परिसरात काही शिवारात अचानकच पावसाच्या सरी कोसळल्या यामुळे अनेक शेतक-याचे काढणी चालु असलेले सोयाबीन या पावसात वावरावरच भिजले. यामुळे शेतक-याची एकच धांदल उङाली. भादा व परिसरातील काही शिवारात आज दुपारी अचानक पावसाने हजेरी लावली. सध्या सोयाबीन काढणीचे कामे मोठ्या प्रमाणात चालु असुन अनेक ठिकाणचे सोयाबीन पाण्यात व चिखलात आहेत. यामुळे शेतकरी अगोदरच वैतागलेले असताना आज दुपारी पुन्हा दोन वाजण्याच्या सुमारास अचानक पावसाने हजेरी लावली. यात अनेक शेतक-याचे सोयाबीन वावरातच भिजले तर काहीच्या गंजी काही प्रमाणात भिजल्या. अचानक आलेल्या पावसाने शेतक-याची एकच तारांबळ उङाली.


Post a Comment

0 Comments