Latest News

6/recent/ticker-posts

चाकूर तालुक्यात शिवसेनेच्या सदस्य नोंदणीला प्रारंभ

चाकूर तालुक्यात शिवसेनेच्या सदस्य नोंदणीला प्रारंभ



चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) नुकतेच चाकुर ता. अष्टा मोड येथील शिवसेना संपर्क कार्यालयासमोर शिवसेना सदस्य नोंदणीचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटक शिवसेना नेते तथा मराठवाडा संपर्क नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना जिल्हाप्रमुख नामदेव मामा चाळक प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हाप्रमुख सुभाष दादा काटे नगरसेवक वीरभद्र गादगे,सभापती न.प,चाकुर गोपाळ माने, उपस्थित होते.चंद्रकांत खैरे आपल्या भाषणात ठाकरे सरकार शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीमागे असल्याचे सांगितले माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब १८ तास काम करत असून बैठकीच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीचा आढावा घेत आहेत आणि आम्हाला कोरोना काळात देखील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आढावा घेण्यास सांगितले आहे म्हणून शिवसेनेचे सर्व वरिष्ठ नेते व मंत्री आज महाराष्ट्रभर फिरताहेत आपल्या जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे होत असलेल्या सोयाबीन पिकांचे पंचनामे करणे संबंधी पालकमंत्री ना. अमित देशमुख यांच्याशी बोलणार असल्याचे सांगितले या कार्यक्रमाचे आयोजक तालुकाप्रमुख गुणवंत पाटील यांनी आपल्या प्रस्ताविक भाषणामध्ये चाकूर तालुक्यात २१ हजार सदस्य नोंदणी करणार असल्याचे सांगितले व त्यांच्या गावापासून शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख यांची नेमणूक करण्यास सुरुवात केली शाखा प्रमुख शिवदीप लक्ष्मण निकम व उपशाखाप्रमुख मनोज भुजंग निकम यांना चंद्रकांत खैरे यांच्या स्वाक्षरीने नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान केला व तालुक्यातील प्रत्येक गावाचा दौरा करून प्रत्येक गावात शाखाप्रमुख व उपशाखाप्रमुख यांची नेमणूक करून त्यांची यादी जाहीर करणार असल्याचे सांगितले यावेळी तालुक्यातील पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments