Latest News

6/recent/ticker-posts

शिष्यवृत्ती परीक्षेत महाराष्ट्र विद्यालय, निलंगा या शाळेची भरारी

शिष्यवृत्ती परीक्षेत महाराष्ट्र विद्यालय, निलंगा या शाळेची भरारी



निलंगा:(प्रतिनिधी/इरफान शेख)शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यात महाराष्ट्र विद्यालय निलंगा या शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी बजावली आहे. या शाळेतील इयत्ता पाचवीतील 29 व इयत्ता आठवीतील 9 असे एकूण 38 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाले आहेत. सदर परीक्षेत इ. 5वी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी आदित्य सुर्यवंशी, अक्षता, कोरके, अनिकेत जाधव, अश्विनी पांचाळ, अस्मिता उबाळे, भक्ती गिरबने, भक्ती मन्नाळे, बुद्धभुषण ढेरे, गजवान तांबोळी, गणेश वाघमारे,घनश्याम नाईकवाडे, कल्याणी मुळे, लावण्या फटाळे, प्रेम शिंदे, पृथ्वीराज बंडगर, राघवेंद्र सबनीस, राम पांचाळ, सबा अन्सारी, साधना बिराजदार, समर्थ मोहोळकर, सानिका आरीकर, शैलेश शिंदे, श्रावणी मोहळकर, श्रावणी पेद्दे, श्रेया सोमवंशी, श्वेता भंडे, श्वेता टाकेकर, सृष्टी गिरबने, विराज गिरी इ. 8वी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी अक्सा सय्यद, अंजली हजारे, पियुश धर्मशेट्टी, प्रतीक औटे, समरीनफातेमा सत्तारी, शाश्वत भांगुरे, सृष्टी मुळजे, सृष्टी मिरगाळे, श्रुतीका झरकर या विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष विजय पाटील निलंगेकर, शाळेचे मुख्याध्यापक पाचंगे आर.के., उपमुख्याध्यापक पवार डी.डी., पर्यवेक्षक श्रीमती देशमुख एस.डी.परीक्षाविभाग प्रमुख रोडे बी.टी., सांस्कृतिक विभाग प्रमुख बिराजदार आर.ए.व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


Post a Comment

0 Comments