वादळी पावसांमुळे उडुन जाऊन भिजलेल्या शेतकऱ्यांच्या गंजीचे पंचनामे करण्याची शिवसेनेची मागणी
चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) चाकुर तालुक्यातील गोळा केलेल्या सोयाबीन च्या गंजीवरील चवाळे वादळी पावसांमुळे उडुन जाऊन भिजलेल्या शेतकऱ्यांच्या गंजीचे पंचनामे करुन शासनांस सादर करावे अशी मागण्यांचे निवेदन चाकुर तहसिलदार डॉ.शिवानंद बिडवे यांना चाकुर तालुका शिवसेनेने मागणी केली आहे. चाकुर तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून वादळी वार्यासह मुसळधार पाऊस झाल्यामुळे गोळा केलेल्या सोयाबीनच्या गंजीवरील चवाळे वारे आणि पावसामुळे उडुन जाऊन संपूर्ण सोयाबीनच्या गंजी भिजल्या आहेत.शेतकऱ्यांनी शेतातील सोयाबीन जमा करुन गोळा केलेल्या चाकुर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आतोनात नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीनचे नुकसान झाले आहे. त्यांचे तात्काळ पंचनामे करणे संबंधीचे आदेश देण्यात यावेत आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणे संबंधी कार्यवाही करावी.आज रोजी शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास गेलेल्यामुळे शेतकऱ्यांकडे रब्बी हंगामासाठी मशागत व पेरणी करण्यासाठी क्षमता राहिली नाही.ताबडतोब जाय मोक्यावर जाऊन पंचनामे करुन नुकसानीचा अहवाल शासनास सादर करावा जेणे करुन शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत मिळेल अशी मागणी शिवसेना चाकु तालुक्याचे अध्यक्ष गुणवंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या निवेदनांवर शिवसेना चाकुर तालुका अध्यक्ष गुणवंत पाटील,दिलीप पाटील,निलेश मद्रेवार,गजानन होनराव,नागनाथ पाटील,धोंडीराम मुठ्ठे,आदि शिवसेनेच्या पदधिकारी यांच्या स्वाक्षरी आहेत.
0 Comments