Latest News

6/recent/ticker-posts

अतिवृष्टीमूळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्या - मराठा सेवा संघ

अतिवृष्टीमूळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्या - मराठा सेवा संघ



निलंगा:{शहर प्रतिनिधी/इरफान शेख} तालुक्यात व राज्यात अचानक झालेल्या अतिवृष्टी व चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन ,ऊस व पशुधन इतर पिकांचे ही नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांच्या हाताला आलेले सोयाबीन पाण्यात वाहून गेले आहे व अनेक ठिकाणी पाण्यात थांबून नुकसान झाले आहे ऊस पीक चक्रीवादळामुळे पूर्णतः जागेवरती मोडून आडवा पडला आहे यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले असून त्यांचा संसार उघड्यावरती आला आहे त्याना यातून उभारी मिळणे अत्यावश्यक आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांना सरसकट सोयाबीन व इतर पिकासाठी एकरी 50 हजार रुपये व बागायतीसाठी एकरी 1 लाख रुपये नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी अन्यथा मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, विरभगतसिंग विद्यार्थी परिषद यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशा मागण्याचे निवेदन विकास माने(उपविभागीय अधिकारी,निलंगा) यांना देण्यात आले यावेळी डॉ.उध्दव जाधव, कुमोद लोभे, डी.बी.बरमदे, जाधव एम.एम, डी.एन.बरमदे, प्रा.डॉ.हंसराज भोसले, जाधव ए.पी, अजय मोरे, सुबोध गाडीवान, विनोद सोनवणे, सचिन नाईकवाडे, प्रमोद कदम ,इर्शाद शेख, नयन माने, बंटी देशमुख, कुलदीप सूर्यवंशी, माधव गाडीवान, सुरज धुमाळ, अजित लोभे आदी जणांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. 


Post a Comment

0 Comments