निलंगा मतदारसंघात राज्यमंत्र्याचा नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा
निलंगा:{शहर प्रतिनिधी/इरफान शेख}निलंगा मतदारसंघामध्ये आज शुक्रवारी राज्यमंत्री मा.ना.संजय बनसोडे यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. जिरायत शेतीला ५० हजार तर बागायत शेतीला १ लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने करण्यात आली.आता कस जगावं साहेब, वर्ष कस लोटाव अशा निराश जनक प्रतिक्रिया अतिवृष्ट शेतकऱ्यांच्या होत्या सावरी येथे नामदेव सगरे यांच्या शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. याप्रसंगी माजी मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर , जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसिलदार गणेश जाधव, कृषी विभागाचे अधिकारी, अभय सोळुंके, अविनाश रेशमे, इस्माईल लदाफ,धम्मानंद काळे यांच्यासह आदी जण उपस्थित होते. राज्यमंत्री ना.संजय बनसोडे यांनी चिखल तुडवत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. आता वर्ष कसा काढावा, जनावरांना चारा मिळणे अवगड आहे अशा अनेक समस्या राज्यमंत्र्यासमोर शेतकऱ्यांनी मांडल्या यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी निश्चित सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे सरकार सर्वतोपरी मदत करण्यासाठी शासन प्रयत्न करणार असल्याचे राज्यमंत्र्यानी यावेळी सांगितल.
0 Comments