महाराष्ट्र नव निर्माण सेना लातूर च्या वतीने जिल्हाधिकारी व आयुक्तांना निवेदन
लातूर:{प्रतिनिधी}दि.२९ रोजी महाराष्ट्र नव निर्माण सेना लातूर च्या वतीने जिल्हाधिकारी व आयुक्तांना निवेदन
शासकिय नियमानुसार नाना नानी पार्क व दयानंद कॉलेज ट्रॅक खुले करणे बाबात निवेदन
सध्या नागरिकांनी व्यायाम करण्याकरिताव आरोग्य जपण्यासाठी योग्य ठिकाण नसल्याने रोडवर फिरत असल्याचे दिसत आहे.रोडवरील वाहतूक ही नागरिकांना व महिलांना अडचणी ठरत आहेत.आरोग्याच्या निष्कर्षानुसार नागरिकांना कोरोनाचा सामना करायचा असेल तर नियमित व्यायाम व फिरणे महत्वाचे आहे.त्यानुसार नागरिकानीं सकाळी फिरणे गरजेचं आहे.लातूर शहरातील क्रीडा संकुल हे खुले करण्यात आले.त्या नियमानुसार नाना नानी पार्क व दयानंद कॉलेज येथील ट्रॅक खुले करण्यात यावे,जेणे करून जवळ व सोयीचे आणि आपल्या आरोग्य जपण्यास सहाय्य होईल.व्यायाम करा आणि आरोग्य जपा हे गरजेचे आहे.त्यामुळे व्यायाम व फिरण्यास नाना नानी पार्क व दयानंद कॉलेज येथील ट्रॅक खुले करण्यात यावे, अन्यथा आंदोलनाचे मार्ग स्वीकारण्यात येईल, याची गांभीर्याने नोंद घ्यावी आसा इशारा देण्यात आला.यावेळी मनसे शहर संघटक अँड.अजय कलशेट्टी,शहर उपद्याक्ष वैभव जाधव,अँड.सुरेश सलगरे,योग् शिक्षक दिपकजी गटागट,अँड.शिवकुमार बनसोडे,भ्रष्टाचार निर्मुलन चे पूजा निचळे,उपासे अप्पा,गोपाळ कुलकर्णी,मुन्ना टेंकाळे,दीपक प्रयाग,दीपक सगर, सुधीर पांडे,सशिवलिंग गुज्जर,विश्वनाथ दामा,विशाल मूळे, संजय लोमटे,देव इंगळे,विलास रेड्डी, देवा वडवले,मोरे संजय, विकास चव्हाण,नागेश गोजमगुंडे,वीरेंद्र सौताडेकर,रमेश मूळे, बापू कुंभार,शिरीष माळी,विजय वारद आदीनि स्वाक्षरी केले.
0 Comments