नळेगाव परिसरात उसाचे क्षेत्र वाढणार;घरणी मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले
नळेगाव:{बाळासाहेब शिवाजी बरचे} यावर्षी गेल्या आठवड्यात परतीच्या पावसाने थैमान घातले असून बऱ्याच शेतकऱ्यांचे सोयाबीन वाहून गेले तर कांहींच्या बनमीच्या बनमी वाहून गेल्या तर अनेकांच्या सोयाबीन मध्ये पाणी साचले व परिसरातील तलाव,ओढे,नाले तुडुंब भरल्यामुळे शेतकरी जास्तीत जास्त ऊस लागवड करणार असल्याचे चित्र सध्या तरी आहे. गेल्या 10 ते 12 दिवसांत परतीच्या पावसाने थैमान घातले होते.या पावसामुळे चाकूर व शिरूर अनंतपाळ सीमेवर असलेला घरणी मध्यम प्रकल्प या पावसामुळे 100%भरला असून यामुळे शिवपूर नऊ खेडी योजना व धामणगाव सतरा खेडी योजनेला भरपूर प्रमाणात प्रकल्पात 100%पाणीसाठा झाल्यामुळे या भागतील पाणी प्रश्न मिटला आहे व परिसरातील तलाव ,विहिरी,बोअर ला मोठ्या प्रमाणात पाणी वाढल्यामुळे व शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून ऊस असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा कल ऊस लागवड करण्याकडे असल्यामुळे मागील तीन वर्षे पाऊस कमी प्रमाणात असल्याने या भागातील उसाचे क्षेत्र कमी झाल्यामुळे ऊस बेनेचा भाव 4000 ते 4500 राहील असा अंदाज असून सध्या नोव्हेबर व डिसेंबर महीन्यात ऊस लागवड करण्यासाठी वातावरण पोषक असल्यामुळे ऊस लागवडीकडे ऊस उत्पादक शेतकरी वळतील व या परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढेल असा अंदाज आहे.
0 Comments