Latest News

6/recent/ticker-posts

उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेची निदर्शने

उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेची निदर्शने



निलंगा:(शहर प्रतिनिधी/इरफान शेख )शासनाने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलेली अत्यल्प मदत ही मदत नसून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आलेली आहेत. शेतकऱ्यांची माती वाहून गेली, पीक वाहून गेले, पशुधन वाहून गेले त्यामुळे हेक्टरी 75,000 रु मदत देने अपेक्षित असताना एकरी 4 हजारांची मदत देने ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. शेतकऱ्यांना दिलेली ही मदत नव्हे तर भीक आहे याचा निषेध व्यक्त करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.नरसिंह भिकाने यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. उपजिल्हाधिकाऱ्यांना एक ओळीचे निवेदन देत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्यामुळे झाडाची पाने भेट देण्यात आली.या वेळी तालुकाध्यक्ष सूरज पटेल, शहराध्यक्ष प्रदीप शेळके, जिल्हाप्रसिद्धी प्रमुख यश भिकाणे, सचिव जाकीर शेख, उपाध्यक्ष नजीर मुजावर, शेख शरीफ, अबूबकर सय्यद, विकास सूर्यवंशी आदींसह अनेक मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments