खाली मुंडक वरी पाय करून शासनाचा व महावितरणचा निषेध
लातूर:{प्रतिनिधी}दयानंद गेट परिसरात महाराष्ट्र नव निर्माण सेना,लातूर च्या वतीने खाली मुंडक वरी पाय करत माहावीतरणाचा व महाराष्ट्र शासनाचा निषेध करण्यात आला. कोरोना रोगाने संपूर्ण महाराष्ट्र जनता अडचणीत आली असून त्या रोगाचा सामना करत लोंकांचे आर्थिक बाजू नाजूक झालेली आहे.तीन महिने लॉकडाऊन असल्याने जनतेला कसलेही आर्थिक व्यवहार नसल्याने जनता हतबल झाली आहे.अश्या संकटाच्या काळात महावितरणने जनतेला दिलेले भरमसाठ वीज बिल हे न सोसणारे आहे पहिलेच जनतेच्या हाताला कसलेही काम नसताना तीन महिनेच्या लॉकडाऊन काळात दिलेले वीज बिल हा आंधळा कारभार निषेधानिय आहे अनेक जनतेने व संघटनेने आंदोलना मार्फत शासनाचा निषेध केला .परंतु हे शासन जनतेच्या मूलभूत आडचणीकडे दुर्लक्ष करीत आहे. या शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनसे च्या वतीने खाली मुंडक वरी पाय करून माहावीतरणाचा निषेध, सरकारच करायचं काय खाली मुंडक वरी पाय, संकटाच्या काळातील वीजबिल माफ झालेच पाहिजे,सामान्य जनतेला न्याय मिळालाच पाहिजे, असे बोलके फलक हातात घेऊन अनोखा आंदोलन करत शासनाचा व माहावीतरणाचा निषेध केला.तरी शासनाने लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करून जनतेला या महामारीच्या व संकटातून मुक्त करावे अशी मागणी करण्यात आले.यावेळी मनसेचे शहर संघटक अँड.अजय कलशेट्टी, उपाध्यक्ष वैभव जाधव,राजाभाऊ शिंदे, गोविंद कांबळे,संतोष पतंगे,शिवा बदनाळे,सुनील जाधव,अजिंक्य रेड्डी,गोपाळ खंडागळे,शिवकरण नाटकर,मयूर साबणे आदी उपस्थित होते.
0 Comments