मूलभूत सुविधा नाही पुरवल्यास आंदोलन करू-भाजपा गटनेते सुनील उटगे
लातूर:(जिल्हा प्रतिनिधी बी.जी.शेख)दि.२४ - औसा शहरात मूलभूत सुविधा नाही पुरवणल्यास पालिकेच्या विरोधात नागरिक व भाजप कार्यकर्ते यांना घेऊन आंदोलन करू.असे निवेदन पालिकेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांना देण्यात आले आहे.
तावरजा प्रकल्पात मुबलक पाणीसाठा असतानाही शहरात सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. विशेष प्रभागात वरवरची कामे करून आम्ही किती काम करत आहोत असे दाखवण्याचा नाटकीपणा सद्यस्थितीला चालू आहे. शहरांमध्ये अनेक ठिकाणी अर्धवट रस्ते ठेवून नागरिकांना याचा त्रास होत आहे. ही अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करावीत तसेच शहरांमध्ये वराह वाढले आहेत त्यालाही आळा घालावा. डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने रोगराई वाढली आहे त्यासाठी फवारणी करावी व वाढणाऱ्या रोगराईला आळा घालावा असेही निवेदनात म्हटले आहे. शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावरती खड्डे पडले आहेत त्या खड्ड्यामध्ये मुरूम टाकून रस्ते सुरळीत करावे.
अशा वेगवेगळ्या मागण्यांचे निवेदन दिनांक 22 ऑक्टोंबर रोजी मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे. या निवेदनावर सूनील उटगे, लहू कांबळे, एकनाथ बनसोडे मकरंद रामपुरे, अच्युत पाटील यांच्या स्वाक्षर्या आहेत.
0 Comments