आंतरजातीय व दिव्यांग- अव्यंग विवाहास प्रोत्साहन
चाकूर:{ता.प्र./सलीम तांबोळी} समाजातील सर्व प्रकारच्या जातीभेदाची आणि असमानतेची दरी दूर होऊन समाज एकसंघ व्हावा म्हणून मागासवर्गीय व सवर्ण यांच्यातील विवाहाप्रमाणेच मागसवर्गीयांमध्ये विविध प्रवर्गातील आंतरजातीय विवाहांनादेखील प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, लातूर अंतर्गत "आंतर जातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य योजना” ही योजना राबवली जात असून या योजेने अंतर्गत आंतर जातीय विवाह केलेल्या जोडप्यांना रु. 50,000/- प्रोत्साहनपर अर्थसहाय्य दिले जाते. सदर योजनेचे अर्थसहाय्य हे 50 टक्के राज्य शासन हिस्सा व 50 टक्के केंद्र शासन हिस्सा या स्वरुपात दिले जाते.
सदर प्रस्तावासोबत खालील प्रमाणे कागद पत्रे सादर करावीत.
1. विवाह नोंदणी दाखला दाखला
2. विवाहितांचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
3. जात प्रमाणपत्र
5. विवाहीतांचे लग्नावेळेसचा फोटो
6.दोन प्रतीष्ठीत व्यक्तीचे योजनेचा लाभ मिळणे बाबत शिफारस पत्र
7.विवाहीतांचे तहसीलदार यांनी दिलेले रहिवाशी प्रमाणपत्र
तसेच दिव्यांग व अव्यय विवाहीतांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनातर्फे समाज कल्याण विभागामार्फत रु. 24500/- रोख स्वरुपात व 25,000/- बचतपत्र देण्यात येते. सदरील योजनेचा लाभ घेणे करीता दिव्यांग व अव्यंग विताहीनांता विवाह झाल्यापासुन एक वर्षाच्या आत समाजकल्याण विभागामध्ये प्रस्ताव सादर करावा.
सदर प्रस्तावासोबत खालील प्रामणे कागदपत्रे सादर करावी.
1. वधु अथवा वराचे दिव्यांगत्वाचे सक्षम प्राधिका-याने दिलेले प्रमाणपत्र
2. दुसरा वधु अथवा वर सुद्रुढ असलयाचे वैदयकीत अधिका-याचे प्रमाणपत्र
3. वधु व वराच महाराष्ट्रचे रहिवासी असल्याबाबतचे अधिवास (Domiciled) प्रमाणपत्र
5. विवाह नोंदणी दाखला
6. वर व वधु यांचा शाळा सोडल्याचा दाखला
7. वर व वधु यांचा एकत्रीत फोटो
8. दोन प्रतिष्ठीत व्यक्तींची शिफारसपत्रे देणे आवश्यक आहे.
तरी आंतर जातीय विवाहीतांनी व दिव्यांग -अव्यंग विवाहीतांनी सदर योजनांचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा असे अवाहन समाजकल्याण सभापती रोहीदास वाघमारे यांनी केले आहे.
0 Comments