शिवसैनिक प्रा.आण्णासाहेब मिरगाळे यांच्या प्रयत्नांना अखेर यश
निलंगा:(शहर प्रतिनिधी/इरफान शेख)निलंगा शहारापासुन पंधरा किलोमीटरच्या आत जेवढी गावे आहेत त्या गावाना घरपोच गैस देने बंधनकारक आहे तसा शासनाचा नियम आहे. प्रत्येकाना घरपोच सेवा देण्याचे पैसे घेतले जातात. पण घरपोच सेवा मिळत नसल्यामुळे शिवसैनिक प्रा.आण्णासाहेब मिरगाळे यांनी मा.तहसीलदार निलंगा यांना निवेदन दिले. त्यावर मा.तहसीलदारांनी निलंगा तालुक्यातील एजन्शींला घरपोच सेवा देने बंधनकारक राहिल अशी नोटिसही बजावली. शिवसैनिक प्रा.आण्णासाहेब मिरगाळे यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे अखेर त्यांच्या प्रयत्नांला यश आलं आज रविवारी निलंगा तालुक्यातील नणंद गावात दसराऱ्याच्या शुभमुहर्तावर गावात गैस देण्यास सुरुवात झाली आहे . शिवसैनिक प्रा.आण्णासाहेब मिरगाळे यानी गैस मिळण्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल ननंद गावतील सर्व नागरिकांडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
0 Comments