Latest News

6/recent/ticker-posts

चाकूरच्या तरूणांनी बनवलं कोरोना योध्दयांसाठी रेस्पिरेटर

चाकूरच्या तरूणांनी बनवलं कोरोना योध्दयांसाठी रेस्पिरेटर



चाकुर:(ता.प्र.सलीमाभाई तांबोळी) जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसार एन ९५ मास्क कोरोना पासून बचाव करतो, पण हा मास्क जास्त वापरल्यामुळे फुफुसांवरील ताण वाढतो, या समस्येवर मात करण्यासाठी पुणे येथे स्थायिक असलेल्या चाकूरच्या इंजिनीअर व डॉक्टरने शुध्द हवा देणाऱ्या एका उपकरणाचा शोध लावला आहे, त्याच्या नावाने याचे पेटंट प्रकाशित झाले आहे त्यांनी निर्माण केलेलं हे उपकरण कोरोना योध्दयासाठी उपयुक्त ठरणार आहे.कोरोनापासून बचावासाठी एन ९५ मास्कचा वापरा केला जात आहे परंतू यापासून अनेक धोके असल्यामुळे विकसीत देशामध्ये पीएपीएआर या साधनाचा वापर केला जातो. कोरोनाच्या साथीमुळे पीएपीआरची मागणी वाढली असून तुटवडा जाणवत आहे. याची किंमत जास्त असल्यामुळे सर्वांना ते वापरण्यास अडचण येते. यावर मात करण्यासाठी पुणे येथील स्थायीक असलेले चाकूरचे अभियंता व्यंकटेश सुभाष सुवर्णकार व प्रसिध्द न्युरो सर्जन डॉ. भास्कर मधुकर केंद्रे, अभियंता अनिल रणवीर व शुभांगी व्यंकटेश सुवर्णकार यांनी एक हलका, छोटा, स्वस्त व प्रभावी अशा शुध्द हवा देणाऱ्या उपकरणाची निर्मीती केली आहे. हे उपकरणं बनवताना तांबे, प्लास्टिक व व्हेंटीलटर वर वापरत येणारा एचएमई फिल्टर यांचा उपयोग करण्यात आला आहे. यातून कपाळा भोवती उच्च दाबाची शुद्ध हवा मिळते त्यामुळे बाहेरची दूषित हवा आत येत नाही. याच्या वापरामुळे बॅक्टेरिया, वायरस आणि धुळीपासून संरक्षण मिळणार आहे. हे उपकरण कोरोनाच्या संकट काळात कोरोना योद्धा म्हणून भूमिका बजावित असलेले आरोग्य कर्मचारी, पोलीस, पालिकेचे कर्मचारी, बँकचे कर्मचारी, आशाताई यांना कोरोना पासून संरक्षण देईल. या शोधासाठीचे पेटंट नुकतेच प्रकाशित झाले आहे. सध्याच्या अनुमानानुसार कोरोनाची दुसरी लहर आपल्या भारतात येवू शकते. अश्या परिस्थितीमध्ये हे उपकरणं कोरोना योध्दांसाठी कवच ठरू शकणार आहे. 


कोरोनाच्या संकट काळात आलेल्या अनुभवावरून हे उपकरण तयार केलं असून कोरोना योध्दा म्हणून काम करीत असलेले डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी हे उपयुक्त ठरणार आहे.  


व्यंकटेश सुवर्णकार, अभियंता, पुणे


मास्कच्या अती वापरामुळे अनेक आजार होऊ शकतात यासाठी शुध्द हवेचा पुरवठा करणाऱ्या या उपकरणाचा शोध लावला असून याचा वापर केल्यामुळे कोरोनासह दुषीत वातावरापासून संरक्षण मिळणार आहे. 


डॉ. भास्कर केंद्रे, न्युरो सर्जन, लातूर


Post a Comment

0 Comments