Latest News

6/recent/ticker-posts

पाणी असूनही औसा शहराची अवस्था उन्हाळ्या सारखीच "धरण उशाला अन् कोरड घशाला" 

पाणी असूनही औसा शहराची अवस्था उन्हाळ्या सारखीच "धरण उशाला अन् कोरड घशाला" 



लातूर:(जिल्हा प्रतिनिधी बी.जी.शेख)औसा शहराला पाण्याची कमतरता नेहमी जाणवते.मात्र यावर्षी पावसाळा चांगला झाल्याने पाणीपुरवठा करणार्‍या तावरजा प्रकल्पात भरपूर पाणी साठा असूनही शहराची अवस्था उन्हाळ्यात ज्या पद्धतीची होती तशाच पद्धतीची आजही असल्याचे चित्र दिसून येते.


शहराला उन्हाळ्यात ज्या प्रमाने महिन्यात एकदा पाणीपुरवठा केला जात होता त्याच प्रमाणे आजही पाणीपुरवठा केला जात आहे.


शहराला माकणी धरणातून पाणी पुरवठा करण्यासाठी मोठी योजना मंजूर करण्यात आली आहे. काही दिवसात त्याही योजनेचे पाणी शहराला येईल ,अशी आशा औसेकरांनां आहे .मात्र या कामाला संथगती असल्याने काम कधी पूर्ण होईल ?असा प्रश्न येथील जनतेला पडला आहे. पाणीपुरवठा सभापती गोविंद जाधव यांना याबाबत विचारले असता त्यांनी काही "तांत्रिक अडचणीमुळे पाणीपुरवठा करायला उशीर होत आहे.पाणी भरपूर असूनही काही अडचणीमुळे योग्य रीतीने पाणीपुरवठा सद्यस्थितीमध्ये करू शकत नाही.मात्र पाच ते सहा दिवसानंतर आठवड्याला एकदा शहराला पाणीपुरवठा केला जाईल." अशी प्रतिक्रिया 'इशाराच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.


काहीही असो "धरण उशाला अन् कोरड घशाला अशी अवस्था औसेकरांची झाली आहे.


Post a Comment

0 Comments