भाद्यात चमकते तारे अंधारातच !!
मायानगरी ने दखल घेतलेला हिरो गावात मात्र बेदखलच !!
{बाबुराव आगलावे}
लातुर : काही माणसे अशी असतात ज्यांचे कार्य गावाच्या नावलौकीकात भर घालत असते. लातुर जिल्ह्यात भादा हे तर पिढ्यान पिढ्या नाट्य कलेचं माहेरघर असलेलं गावं याचं गावातल्या एका उगवत्या कलाकाराची दखल थेट मायानगरीनेच घेतली . गावच्या नाट्यकलेतुन घडत गेलेला ह्या मस्त कलंदरची दखल चित्रपट नगरीने घेतली व गार्गी या लघुपटात भाद्याच्या अख्तर कदिरसाब शेखने आपली जादु दाखवली . एवढेच नव्हे तर एक कवी मनाचा असलेला या नाट्य लेखकाने आजवर जालना ' पंढरपुर ' नागपुर सह राज्यातील अनेक शहरातील कवी संम्मेलनात आपल्या बहारदार सदाबहार कवीता सादर करुन रसिकांची मने जिंकली . आजवर जवळपास साडेतीनशे कवितेची रचना करुन स्टार मेकरवर आपल्या मधुर आवाजात सातशेच्यावर गाणे गाणा-या या चित्रकाराचा आवाज भाद्यात मात्र का दुर्लक्षीत होतोय हे नवलच वाटतय ! आपल्या जादुई बोटाने मनाला वेड लावणारे चित्र काढणारा हा चित्रकार जगावेगळाच आहे. आजवर अनेक नाटकात सदाबहार अभिनय करणारा व राज्य स्तरापर्यंत अखेरचा श्वास २०९९ हा नाटक सादर करणा-या कलाकाराचा सन्मान होने गरजेचे आहेच. याच शिवाय भाद्याचेच भुमिपुत्र असलेले डॉ . अनंत कठारे व डॉ. निशांत ऊबाळे यांनी लंपीस्किन या जिवघेण्या पशु्ंच्या आजारातुन गावच्या पशुचे शेतात चिखलात जाउन केलेले लसीकरण हे खुपच गावच्या पशुधनासाठी महत्वाचे ठरले. गावची हि जोडी रात्री बेरात्री कधीही शेतक-याच्या शेतात जाउन पशुवर उपचार करतात त्यांचे हे कार्य शेतकऱयांसाठी अतिशय अनमोल ठरत आहे. गरज आहे ती फक्त गावक-याकडुन त्यांना शाब्बासकी देण्याची . याच शिवाय लॉकडाउनच्या काळात भादेकरांची सतत काळजी घेणा-या व अहोरात्र गावच्या आरोग्यासाठी मेहनत घेणा-या भादा प्राथमीक आरोग्य उपकेद्रातील कर्मचा-याच्या सेवेचीही दखल भादेकरांनी घेउन त्यांचाही गौरव करणे गरजेचे वाटते.
0 Comments