Latest News

6/recent/ticker-posts

माळकौठा महाटी रस्त्यावर रेती वाहतूक टिप्पर पल्टी;चालकासह दहा मजूरांना जबर मार एकाचे दोनी पाय निकामी 

माळकौठा महाटी रस्त्यावर रेती वाहतूक टिप्पर पल्टी;चालकासह दहा मजूरांना जबर मार एकाचे दोनी पाय निकामी 



नांदेड:(जिल्हा प्रतिनिधी/ पिराजी गाडेकर) मुदखेड तालुक्यातील माळकौठ्याहून येळी महाटी दिशेने भरधाव वेगात जानारा रेती वाहतूक टिप्पर चालकाचा ताबा सूटल्याने महाटी चढाच्या वळणावर पल्टी खाला आहे.यात ड्रायवर सह रेती भरनारे अनेक मजूर जबर जखमी झाले आहेत तर,त्यापैकी एकाचे दोनी पाय निकामी झाल्याची माहिती प्राप्त आहे.


    गंगापट्यातील वाळूघाट लीलावासाठी सूटले नसतांना देखील ईकडे नेहमीच रेती गाड्यांची आदळ आपट चालूच असते.चोरुन मारलेला स्टाॕक आसतो.वैध किंवा अवैध रेती ईतर तालूक्यात विक्रीसाठी माळकौठा दरेगाव,किंवा माळकौठा डोणगाव वरुन मुदखेड मार्गे अशा खूसकिच्या मार्गाचा ऊपयोग नेहमीच केला जातो.पहाटेच्या सूमसाम रस्त्यावर रेती टिप्पर वेगाने धावत असतात.हल्ली बांधकामासाठी रेतीला अनन्य साधारण महत्व आले आहे. त्यामूळे हायवा गाडीचे भाव गगणाला भीडले.गत वर्ष दोन वर्षापूर्वी भागात जीथे कुठे रेतीसाठे अस्तीत्वात होती त्याची शोध मोहीम आता रेती तस्करांनी सूरु केली आहे.ऊचललेल्या रेती साठ्याखाली जमीनिवर पडलेली ऊर्ध्वरीत रेती मातीसह ऊचलून धूऊन गाळून त्याची विक्री करण्याचे काम सध्या चालू आहे.अगदी त्याच कामात येनारा माती रेती मीश्रणांने भरलेला एम एच १४ ए एस ९२१७ टिप्पर माळकौठा भागात कुठं कुठं रेती सावडून ता.२४ सकाळी साडेसात आठच्या सूमारास येळी महाटी पूलाच्या दिशेने निघाला.भरधाव धावनाऱ्या टिप्पर चालकाला महाटीच्या चढत्या वळणांने अखेर मात दिली.वळण व गतीचा अंदाज त्याला आला नसल्याने टिप्पर पल्टी झाले.यात अंबादास व्यंकटी कांबळे या सोळा वर्षीय यूवकांचे दोन पाय अंगा वेगळे झाले असून पायाच्या हाडाचे तूकडे व पायावरील मांस बोटे गळून खाली पडली व दोन्ही पाय निकामी झाले,केशव गाढे वय तीस वर्ष,तिरुपती नामदेव ढगे वय पस्तीस,व्यंकटी पवार वय चोविस,नारायण लांडगे वय चौतीस वर्ष,वामन ढगे वय चवतीस,केशव कांबळे वय सोळा,मोहन टोकलवाड वय छत्तीस,कैलास पवार वय चौतीस व सुरकतवार वय एकोनिस या दहा जनांना जबर मार बसला आहे.विष्षपुरीच्या शासकिय रुग्णालयात ऊपचारां साठी दाखल करन्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments