औसा तालुक्यातील आंदोरा येथे नापिकीला व कर्जास कंटाळून एका शेतकऱ्याची आत्महत्या
लातूर:(जिल्हा प्रतिनिधी बी.जी.शेख)दि.२३ - औसा तालुक्यातील मौजे अंदोरा येथे अतिवृष्टी झालेल्या नुकसानीस व कर्जास कंटाळून मधुकर पवार वय ५० या शेतकऱ्याने शेतातील झाडाला दोरीने फास लावून आत्महत्या केली. मागील महिन्यात अतिवृष्टी झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रत अनेक शेतकऱ्यांचे गोळा केलीले सोयाबीन पाण्याखाली आले होते.कसेबसे गोळा केलेले हे पीक परतीच्या पावसाने गोळा करूनही भिजले होते .खर्चापेक्षा उत्पन्न कमी झाल्याने मानसिक रित्या हा शेतकरी खचला होता.तसेच सोसायटीचे कर्जही या व्यक्तीच्या अंगावर होते .म्हणून या व्यक्तीने कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली. आज हेक्टरी दहा हजार रुपये शासनाने मदत जाहीर केली आहे. एका हेक्टरला किती खर्च येतो याचा अभ्यास न करता हि केलेली घोषणा योग्य नाही अशी शेतकऱ्यांतून प्रतिक्रिया येत आहे. शासन असे आणखीन किती आत्महत्या होताना पाहणार आहे. शासनाने हे कुठेतरी थांबवावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
0 Comments