Latest News

6/recent/ticker-posts

धनगर समाजाला अनुसुचित जमाती [एस.टी.]प्रवर्गात समाविष्ट कराध;नगर समाजांची मागणी

धनगर समाजाला अनुसुचित जमाती [एस.टी.]प्रवर्गात समाविष्ट कराध;नगर समाजांची मागणी



धनगर आरक्षणासाठी चापोलीत अर्ध जलसमाधी आंदोलन 


चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जय मल्हार सेनेच्या वतीने चापोलीत अर्ध जलसमाधी आंदोलनांची हाक दिली होती.चापोली येथील समाज बांधवांनी प्रतिसाद देत.गुरुवारी आमराईतील बंधार्यात अर्धवट पाण्यात उभे राहुन घोषणा देत अर्ध जलसमाधी आंदोलन केले.धनगर समाजाला अनुसुचित जमाती [एस.टी.] प्रवर्गात समाविष्ट करावे.यासाठी समाज बांधव आक्रमक झाले आहेत.यासाठी जय मल्हार सेनेचे सरसेनापती लहुजी शेवाळे यांनी राज्यभर अर्ध जलसमाधी आंदोलनांची घोषणा दिली होती.त्यामुळे चापोलीत धनगर समाज बांधवानी येथील अमराईत बंधार्यावर वाहत्या पाण्यात उतरुन अर्ध जलसमाधी आंदोलन केले.


यावेळी आरक्षण आमचा हक्क आहे.तो आम्ही मिळणारच अशा घोषणा देण्यात आल्या,यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख संतोष गडादे,युवा तालुकाप्रमुख नारायण काचे,खंडेराव शेवाळे,बालाजी कोरे,दीपक शेवाळे,दत्ता हाके,गोविंद शेवाळे,राम सेवाळे,यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments