Latest News

6/recent/ticker-posts

रामायण रचिते महर्षी वाल्मिकी जयंती साजरी करा-वाल्मिकी संघटनेची मागणी

रामायण रचिते महर्षी वाल्मिकी जयंती साजरी करा-वाल्मिकी संघटनेची मागणी



लातूर(जिल्हा प्रतिनिधी बी.जी.शेख) दि. 31 ऑक्टोबर 2020 रोजी रामायण रचिते महर्षी वाल्मिकी यांची जयंती असून शासन परिपत्रकानुसार महर्षि वाल्मिकी यांची जयंती सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात साजरीं करणे आवश्यक आहे परंतु गत वर्षी आपल्या अधिपत्याखालील अनेक कार्यालयाने तसेच ग्रामपंचायत स्तरावर जयंती साजरी करण्यात आलेली नाही यामुळे आपणास विनंती करण्यात येते की दिनांक 31 ऑक्टोबर 2020 रोजी आपल्या अधिपत्याखालील सर्व शासकीय कार्यालयात तसेच ग्रामपंचायत कार्यालयात शाळा अंगणवाडी इत्यादी सर्व ठिकाणी महर्षी वाल्मिक यांची जयंती साजरी करणे बाबत आदेशित करण्यात यावे अशी विनंती मुख्य कार्यकारी अधिकारी जी प लातूर यांना सदरील निवेदनावर करण्यात आली आहे.


या निवेदनावर अखिल भारतीय धाडस वाल्मिकी संघटना यांनी केली असून यांवर अनिल कोळी, गोविंद ढवळे, सोमनाथ कोळी,सुनील मनोरे,रुपेश शंके,बाळासाहेब कोळी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


Post a Comment

0 Comments