Latest News

6/recent/ticker-posts

आर्थिक अडचण असली तरी शासन शेतकऱ्यास कर्ज काढून मदत देणार.राज्यमंत्री अब्दूल सत्तार

आर्थिक अडचण असली तरी शासन शेतकऱ्यास कर्ज काढून मदत देणार.राज्यमंत्री अब्दूल सत्तार



लातूर:(जिल्हा प्रतिनिधी बी.जी)दि.२२ लातूर. जिल्हयात काही मंडळामध्ये अतिवृष्टी तर काही मंडळात संततधार पाऊसामुळे सोयाबीन व इतर पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या पंचनाम्यात एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची संबंधित अधिकारी वर्गाने दक्षता घ्यावी अशा स्पष्ट सूचना राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे,खार जमिनी विकास राज्यमंत्री अब्दूल सत्तार यांनी दिल्या.


जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित अतिवृष्टी पिक नुकसान व कोरोना संसर्ग आढावा बैठकीत ते बोलत होते.या बैठकीस जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, मनपा आयुक्त देवीदास टेकाळे, अधिष्ठाता डॉ.मोहन डोईबळे, शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी व नामदेव चाळक उपस्थित होते.


या बैठकीस मार्गदर्शन करताना राज्यमंत्री अब्दूल सत्तार म्हणाले की, जिल्हयात अतिवृष्टी व संततधार पावसामुळे सोयाबीन व इतर पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या पिकनुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करुन एक ही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.राज्यातील महाआघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून मदत करणारच आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे पूर्ण करुन अहवाल शासनास पाठवावा. शासनाकडे आर्थिक अडचण असली तरी शेतकऱ्यांसाठी राज्यशासन कर्ज काढून मदत करेल.असे राज्यमंत्री अब्दूल सत्तार यांनी स्पष्ट केले.


भविष्यात कोरोना संसर्ग होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.व जिल्हयात कोरोना संसर्गावर प्रशासनाने केलेल्या कार्याबद्दल जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांचे त्यांनी कौतुक केले. 


जिल्हयात अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील रस्त्याचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये काही सार्वजनिक बांधकाम विभाग व काही रस्ते जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाअंतर्गत येतात. या नुकसान झालेल्या सर्व रस्त्याच्या दुरुस्तीचे कामे संबंधित विभागाने तात्काळ सुरु करावीत. अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या. 


या अतिवृष्टी पिकनुकसान पाहणी कार्यक्रमास शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी व नामदेव चाळक, तालुका शिवसेना प्रमुख सतिश शिंदे व रमेश पाटील, औसा- रेणापूरचे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, औसा तहसिलदार शोभा पुजारी, निलंगा उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसिलदार गोरख जाधव, जिल्हा कृषि अधिक्षक दतात्रय गावसाने, प्रशासनातील अधिकारी ,मंडळ अधिकारी, तलाठी,कृषि सहाय्यक, शेतकरी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments