Latest News

6/recent/ticker-posts

चाकुर तालुक्यातील सोयाबीनचे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी

चाकुर तालुक्यातील सोयाबीनचे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी



अब्दुल सत्तार राज्यमंञी (महसुल ,ग्रामविकास मंञी महाराष्ट्र राज्य) यांच्याकडे शिवसेनेची मागणी 


चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) महाविकास आघाडीचे महसुल मंञी अब्दुल सत्तार लातुर दौऱ्यावर आले असता.चाकुर तालुका शिवसेनेच्या वतीने चाकुर तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवी यासाठी मागणी करण्यात आली. मागील कांही दिवसांपुर्वी अचानक आस्मानी संकट चाकुर तालुक्यावर आले.शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन काढुण ठेवले होते. सोयाबीनवरील वादळी पाऊसांमुळे गंजीवरील ताटपञी उडुन जाऊन शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते.त्या नुकसांनीचे पंचनामे करुन ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकांचे अतिवृष्टीमुळे व वादळामुळे नुकसान झाले आहेअशा शेतकऱ्यांना मदत मिळणे विषयी तहसिलदार  यांना दिलेल्या दिनांक १६.१०.२० च्या निवेदना विषयी चर्चा केली असता मंञी महोदयांनी तहसिलदार डॉ.शिवानंद बिडवे यांच्याशी दुरध्वनी वरुन संपर्क केला व असे निर्देश दिले की ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टी व वादळामुळे नुकसान झाले आहे.अशा शेतकऱ्यांचे नुकसांनीचे ताबडतोब पंचनामे करुन अहवाल पाठवण्याचे आदेश दिले.चाकुर तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचे आश्वासन दिले. चाकुर शासनांस तात्काळ आहवाल पाठवावा अशी मागणी तहसिलदार चाकुर यांना शिवसेनेने निवेदनांव्दारे केली होती. यावेळी नामदेव मामा चाळक लातुर जिल्हा प्रमुख शिवसेना,सुनिता चाळक महिला संघटक लातुर जिल्हा,सुभाषदादा काटे माजी जिल्हा प्रमुख शिवसेना,गुणवंत पाटील चाकुर तालुका शिवसेना प्रमुख,रामदास निकम,मोहीन पटेल,अर्जुन नीकम,शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments