निलंगा नगरीत छत्रपती संभाजीराजेचा जंगी स्वागत
निलंगा:(शहर प्रतिनिधी/इरफान शेख) आज सोमवारी खासदार मा.श्री.छत्रपती संभाजीराजे यांची अतिवृष्टी पाहणी दौऱ्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक, निलंगा येथे आले असता माजी मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी मा.श्री.छत्रपती संभाजीराजे यांची भेट घेऊन शेतकरी बांधवांच्या नुकसानीची माहिती दिली.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. यावर त्वरित उपाययोजना करण्यासाठी लक्ष घालण्याची छत्रपती संभाजीराजेंना आ.पाटील यांनी विनंती केली. याप्रसंगी उपस्थित बाळासाहेब शिंगाडे (नगराध्यक्ष, न.प.निलंगा), एम. एम. जाधव सर (मराठा सेवा संघ), कुमोद लोभे, नयनजी माने, विनोदजी सोनवणे, अजीत जाधव व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments