धानोरा गावाला आ.अभिमन्यू पवार यांची भेट
निलंगा:(शहर प्रतिनिधी/इरफान शेख) निलंगा तालुक्यातील धानोरा व मदनसुरी या गावांना भेटी देऊन शेतीच्या झालेल्या नुकसानीची व शेतरस्त्यांची पाहणी आ.अभिमन्यू पवार यांनी केली. आ.पवार ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी संघर्ष करण्याची ग्वाही दिली. पुढे आ.पवार म्हणाले शेतकऱ्यांवर ओढवलेले संकट भीषण आहे. सोयाबीन, तुर आणि ऊसाचे तर अतोनात नुकसान झाले आहेच पण शेताकडे जायच्या रस्त्यांची सुद्धा दुर्दशा झाली आहे. काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे तर काही ठिकाणी शेतच वाहून गेले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासोबतच शेतरस्ते, गावातील रस्ते व नदी, ओढ्यांवरील पुलांच्या दुरूस्तीसाठी/उंची वाढविण्यासाठी/ पुनर्बांधणीसाठी ओला दुष्काळग्रस्त भागासाठी १ वेगळे पॅकेज जाहीर करावे लागणार आहे यावेळी उपस्थित गोविंद जाधव, गजाजन जाधव, श्रीहरी जाधव, दीपक जाधव, पांडुरंग तोष्णीवाल, बळीराम पाटील व मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.
0 Comments