शेतकर्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवून आनेल सिध्दी शुगर कारखाना- आ.बाबासाहेब पाटील
सिद्धी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज बॉयलर अग्नीप्रदीपन सोहळा संपन्न
चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) अहमदपूर तालुक्यातील सिद्धी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज या वर्षीच्या हंगामाचा अग्नी प्रदीपन सोहळा प्रसंगी आ. बाबासाहेब पाटील यांनी शेतकर्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवून आणण्यासाठी सिध्दी शुगर कारखाना वचनबद्ध असल्याचे सांगीतले. ह.भ. प. आनंद महाराज बेलगावकर, ह.भ. प उत्तम महाराज धानोरकर संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव होते. या कार्यक्रमासाठी चाकूर अहमदपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा सिद्धी शुगर आणि अलाईड इंडस्ट्रीजचे चेअरमन बाबासाहेब पाटील, व्यवस्थापकीय संचालक अविनाशभैय्या जाधव, माजी सरपंच साहेबराव जाधव, संचालक सुरज भैया पाटील, लिनाताई पाटील सरव्यवस्थापक पी.जी. होनराव, पी एल मिटकरी शेतकरी अधिकारी, कावळेगुडेकर फॅक्टरी व्यवस्थापक, बाळासाहेब जाधव पाटील चिकटणेकर, देशमुख अविनाश, उत्तमराव देशमुख, बाळासाहेब पाटील झरीकर, हेमंत पाटील, सभापती शिवानंद हेंगणे,तालुकध्यक्ष शिवाजीराव काळे,महेश अर्बन बँकेचे उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे, जी प सदस्य माधव जाधव,माजी सभापती शिवाजी खांडेकर, उपसभापती तुकाराम पाटील, प्रशांत भोसले, सतीश नवटके, सुंदरराव साखरे, श्याम पाटील, अशोक गादेवार, बाळासाहेब पाटील आंबेगावकर, राजाभाऊ शिंदे, डी के जाधव,गोपीनाथ जोंधळे, नबी सय्यद, शिवाजी टेकाळे, देवानंद कानवटे, आदटराव मामा, सूर्यकांत चिगळे, व्यंकट करले, मधुकर करले, प्रा विष्णू पवार, घाटीवाले सर,व्यंकट वंगे, अनिल बेंबडे, शिवशंकर आगलावे,आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना आ. बाबासाहेब पाटील म्हणाले की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना संकट आहे पण त्यावरही मात करून आपण आपल्या साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकर्यांना योग्य न्याय देवून मतदार संघात पुन्हा एकदा हरितक्रांती सोबत शेतकऱ्यांच्या जिवनात धवल क्रांती आणण्याचा निश्चित प्रयत्न करू,कारखान्याचा गळीत हंगाम ६ लाख टन ऊस गाळप करू,शेतकर्यांचा सर्व ऊस संपल्याशिवाय कारखाना बंद होणार नाही. घोषणा आ. बाबासाहेब पाटील यांनी केली.
0 Comments