चाकूरात साईनंदनवनम निसर्ग रम्य परिसरात,शकुंतला ईटीग्रेटड कोवीड सेंटर चा शुभारंभ
ग्रामीण भागातील कोवीड रूग्णानां दिलासा.
चाकूर:(ता.प्रःसलीमभाई तांबोळी) ग्रामीण भागातील कोवीड रूग्णानांच्या सोयीसाठी चाकूरातील डॉक्टर च्या टिमने शकुंतला ईटीग्रेटड कोवीड केअर अँड आईसोलेशन सेंटर चा शुभारंभ नुकताच करण्यात आला आहे.सुप्रसिधद अशा निसर्ग रम्य साईनंदनवन परिसरात या शकुंतला कोवीड सेंटर चा शुभारंभ उपविभागीय पोलिस अधिकारी विद्यानंद काळे यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले आहे.या प्रसंगी व्यासपीठावर सुप्रसिद्ध डॉ.चंद्रप्रकाश नागिमें, बालाजी पाटील चाकूरकर,प्रा.अ.ना.शिंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.या प्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी विद्यानंद काळे म्हणाले की,हे कोवीड सेंटर ग्रामीण भागातील कोवीड रूग्णानां सोयीचे आहे.यामुळे कोवीड रूग्णानां दिलासा मिळणार आहे.डाॅ.चंद्रप्रकाश नागीमें यांनी माफक दरात हे रूग्णालय सेवा देणार असून,येथे सर्व सुविधा उपलब्ध असल्याचे सांगितले.बालाजी पाटील चाकूरकर यांनी याठिकाणी व्हटेलेटरची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली पाहिजे,या साठी आपण सर्वोतोपरी प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले.प्रा.अ.ना.शिंदे यांनी ग्रामीण भागातील कोवीड रूग्णानां हे सेंटर वरदान ठरणार असल्याचे सांगितले.कार्यकमाचे प्रास्ताविक डॉ.संदीप पिचेवार यांनी केले.डाॅ. श्रीनिवास हासनाळे यांनी कोवीड आजाराबद्दल माहिती दिली आणि या रोगाला घाबरून जाऊ नका, मास्क,सनिटायझरस वापरा, गर्दीत जाण्याचे टाळा असे आवाहन केले.या प्रसंगी डॉ.संजय स्वामी, डॉ.एन.जी.मिर्झा, डॉ.कापरतवार, डॉ.सौ.माधवी हासनाळे, डॉ. लक्ष्मण कोरे, डॉ.भरत हाके, दत्तात्रय सुवर्णकार, डॉ.नरेंद्र हाके,आदी सह, नागरिक उपस्थित होते.शेवटी उपस्थितीतांचा आभार डॉ.माधवी हासनाळे यांनी मानले.
0 Comments