मुस्लिम आरक्षण द्या, अफसर शेख यांची पवार साहेबांकडे मागणी
लातुर:(जिल्हा प्रतिनिधी बी.जी.शेख)दि.१८ - माजी कृषिमंत्री व खासदार शरदचंद्रजी पवार हे लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले होते तेव्हा तुळजापूर येथे औसा येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष अफसर शेख यांनी मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावे याबाबतीत निवेदन दिले. सच्चर समीतीच्या अहवालानुसार यापूर्वी आघाडी शासनाने आरक्षण जाहीर केले होते. याबाबत सविस्तर माहिती अशी कि महाविकास आघाडी शासन बनवण्यासाठी सिंहाचा वाटा उचलणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ,माजी केद्रिय मंत्री, माजी मुख्यमंत्री , खा. शरदचंद्र पवार साहेब यांना निवेदनात म्हटलं आहे की मुस्लिम समाजातील शिक्षणातील वाढती बेरोजगारी व आर्थिक परिस्थिती बिकटअसुन या बाबतीत आपण मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुस्लिम आरक्षण ची अमंलबजावणी करणे आवश्यक मुस्लिम आरक्षण आघाडी शासनाने दिलेले असतांना कोर्टाने स्थगिती दिली पण महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीत जाहीर नाम्यात म्हटलं होत की आरक्षण मुस्लिम समाजास लागु करु हा महत्त्वाचा मुद्दा असुन यासाठी राज्य शासन हे विचारधिन आहे. तेव्हा शासनाने याची दखल घेणे गरजेचे आहे अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकमेव युवा अल्पसंख्याक लोकनियुक्त औसा नगराध्यक्ष तथा लातुर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्यध्यक्ष प्रा.डॉ. अफसर (बाबा) शेख यांनी महाविकास आघाडी शासन बनवण्यात सिंहाचा वाटा उचलणारे शरदचंद्रजी पवार हे लातुर दौ-यावर असतांना शिष्टमंडळासह निवेदन दिले. निवेदनावर नगराध्यक्ष अफसर शेख, माजी नगराध्यक्ष शेख जावेद, गोविंद जाधव इनामदार, सूर्यवंशी, शेख मुजाहेद ,अलिशेर कुरेशी इत्यादींच्या स्वाक्षर्या आहेत.
0 Comments