"कसबसं काढलं पाण्यातून, आज ते गेले वाहून"बळीराजाने जगावं कसं?
लातूर:(जिल्हा प्रतिनिधी शेख बी.जी) दि.१४ - संपूर्ण मराठवाड्यात कालपासून मुसळधार पाऊस होत आहे.या पावसात शेतकऱ्यांनी यापूर्वीच्या पावसात खराब झालेले सोयाबीन हे पीक कसेबसे गोळा केले होते .ते या मुसळधार पावसाने वाहून गेल्याचे चित्र लातूर जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी दिसून आले.
शेतकऱ्याचा पाठीमागे कधी शासनाचा तर कधी निसर्गाचा ससेमिरा लागलेला असतो .सुरुवातीला दुबार पेरणीने कंबरडे मोडले होते.
त्यात थोडीशी साथ मिळाली पण हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने पाण्यात गेला. या पाण्यात कष्ट करून काळा पडलेला तर काही सोयाबिन मधून कोंब फुटलेला सोयाबीन गोळा केला होता. गोळा केलेला हा सोयाबीन कालपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने वाहून नेला आहे.
सलग आठ ते दहा वर्षापासून मराठवाड्याला पाण्याची कमतरता होती.यावर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यातच चांगला पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला होता .मात्र त्यानंतर सतत होणाऱ्या पावसामुळे त्याचे भयानक नुकसान झाले .या नुकसानीचे पंचनामे करून घेण्यासाठी विमा कंपनीचे अधिकारी फोटो ची मागणी करू लागले. त्यांनीही शेतकऱ्यांना डावलण्याचा प्रयत्न केला. सक्तीचे आदेश मिळाल्याने व्यवस्थित पंचनामे झाले.आज घडीला गोळा केलेले सोयाबीन वाहून गेलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना वाहून जाणाऱ्या गंजी चे फोटो मागू नये म्हणजे झाले. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
0 Comments