Latest News

6/recent/ticker-posts

अवकाळी वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

अवकाळी वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान



निलंगा:(शहर प्रतिनिधी/इरफान शेख) काल रात्री पासून झालेल्या अवकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला ह्या अवकाळी पावसामुळे निलंगा तालुक्यातील धानोरा गावातील देवराव तुकाराम सूर्यवंशी यांच्या घराची पडझड झाली आहे काल पासून जे अवकाळी वादळी वाऱ्यासह जे पाऊस बरसला त्या पावसामुळे धानोरा गावातील शेतकरी व्यंकट जाधव , फुलचंद जाधव , पंडित जाधव व आणखी काही गावातील शेतकऱ्यांचा ऊस पूर्ण पणे आडवा पडला आहे. सुशिक्षित शेतकरी कृष्णकांत जाधव म्हणाले माझ्या कुटुंबाचं पूर्ण पणे उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे तरी शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्याला आर्थिक मदत करून न्याय द्यावा अशी मागणी जाधव यांनी केली. धानोरा गाव तेरणा नदीकाठी असल्याने नदी काठी असलेले बनिम पाण्यात वाहून गेले आहेत या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे


काही शेतकऱ्यांची तर कालचा वादळी वाऱ्यासह पाऊस जे बरसला त्यात काही शेतकऱ्यांची सोयाबीन ची बनिम वरती ताडपतळी उडून गेली आणि सोयाबीन ची बनिम पूर्ण पणे पाण्याने भिजून गेली. त्या शेतकऱ्यांना बनिम लाऊ पर्यंत किती खर्च आला असेल हे विचार करण्यासारखेच आहे " हाताला आलेला घास गेला " असे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे


Post a Comment

0 Comments