चापोली जिल्हा परिषद सदस्य अरुणाताई कांबळे यांचे निधन
चाकुर:(ता.प्रतिनिधी) जिल्हा परिषद मतदार संघाच्या सदस्या सौ.अरुणाताई कांबळे (५०) यांचे आज अल्पशा आजारांमुळे दुःख निधन गेल्या कांही दिवसांपासुन अरुणाताई कांबळे आजारी होत्या अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.अरुणाताई कांबळे या मुळ आजनसोंडा येथील असुन यावेळी चापोली जिल्हा परिषद मतदार संघाची जागा अनुसुचित जाती महिलेसाठी आरक्षित झाल्यानंतर त्यांनी भा.ज.पा.या पक्षाकडुन निवडणूक लढविली आणि जिल्ह्यात सर्वाधिक मतानं त्या निवडुन आल्या होत्या.जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी विविध गावात नव्याने संघटन निर्माण केलं होतं.त्याच्यासारख्या एक कर्तव्यदक्ष महिला लोकप्रतिनिधी जाणं ही सर्वासाठी दुःखदायक असल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांतुन व्यक्त होताना दिसत आहेत.
0 Comments