Latest News

6/recent/ticker-posts

जनवाडकर यांचा जिल्हाधिकारी यांचाकडुन सत्कार

जनवाडकर यांचा जिल्हाधिकारी यांचाकडुन सत्कार



देवणी:(प्रतिनिधी) देवणी येथील शाशकिय रुग्णालयात कार्यरत असलेले डाॅ.पंकज जनवाडकर यानी कोरोना महामारी च्या कठीण काळात मोलाची भूमिका बजावत कोरोना रुग्णासाठी जिवाची पर्वा नकरता काम केल्या बद्दल त्यांचा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालय लातूूर यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांनी प्रशस्ती पत्र देऊन सत्कार केेेला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय लातुर यांनी असे म्हंटले आहे की, प्रमाणित करण्यात येते की, डाॅ.पंकज जनवाडकर पद:-EMSO(108)विभाग आरोग्य कोरोणा महामारीच्या (कोविड-19)कठीन काळात मोलाची भुमिका बजावत आहात याचा जिल्हा प्रशासनास सार्थ अभिमान असुन भविष्यात अशाच प्रकारची भरीव कामगीरीसाठी जिल्हाप्राधिकरणाकडुन शुभेच्छा देऊन जागतिक आपत्ती धोके निवारणे दिनाचे औचित्य साधुन प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले. याबद्दल देवणी येथील आरोग्या विभागाचे प्रमुख अधिक्षक डाॅ.सगर व सर्व स्टाॅफनी जनवाडकर सत्कार केला.या वेळी जनवाडकर साहेबानां याबद्दल विचारले असता म्हणाले कि डाॅ.सगर साहेबांचे ऊत्कृष्ट कामाचे नियोजन असल्या मुळे मला हे प्रशस्ती पत्र मिळाले असे सांगीतले. यांच्या या कामगीरी बद्दल सर्व स्त्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या वेळी प्रा.नरसिंग सुर्यवंशी, बालाजी कांबळे,दिलीप शिंदे,गीरिधर गायकवाड,बालाजी टाळीकोटे,लक्षमण रनदिवे प्रताप कोयले अभिनंदन केले.


Post a Comment

0 Comments