Latest News

6/recent/ticker-posts

विशेष: खरे ज्ञान मंदिर (शाळा)विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत, ज्ञानदानासाठी शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी

खरे ज्ञान मंदिर (शाळा)विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत, ज्ञानदानासाठी शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी



(बी.जी.शेख) 


संपूर्ण देशात लॉक डाऊन ची प्रक्रिया चालू असल्याने मार्च महिन्यापासून ते आजतागायत शाळा बंद आहेत. शाळा बंद ठेवण्याण्या मागे शासनाचा मोठा उद्देश होता. तो असा की विद्यार्थ्यांना कोरोना महामारी पासून वाचवने. बऱ्याच जणांना असे वाटत होते की उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या नंतर जूनमध्ये शाळा सुरू होईल. मात्र महामारी चा कहर चालूच होता .यासाठी शासनानेही शाळा सुरू करण्याच्या तारखा वेळोवेळी घोषित केल्या. मात्र घोषित केलेल्या या तारखेला शाळा सुरु करण्यासाठी कधी पालक वर्गातून तर कधी शासकीय यंत्रणेतून विरोध दर्शवला गेला. जून महिन्यानंतर ऑनलाइन शिक्षणावर भर दिला गेला .मात्र विद्यार्थ्यांना मोबाईलचा त्रास होईल म्हणून दूरदर्शन वर अध्यापनाचे धडे सुरू करण्यात आले. तेही काही कालावधीनंतर कमी पडू लागले. यात बऱ्याच विद्यार्थ्यांच्या पालकाकडे मोबाईलची कमतरता दिसून आली व याही यंत्रणेत कमी पडत असल्याने शिक्षकांना कसल्याही शासकीय आदेश नसताना विद्यार्थ्यांच्या घरी भेट देण्याची सक्ती सुरू करण्यात आली. यात बऱ्याच शिक्षकांनी स्वतः हुन तर काही जणांनी जबरदस्तीने विद्यार्थ्यांच्या घरी अध्यापनासाठी पाठविण्यात येऊ लागले. शिक्षकांनी सर्व नियमांचे पालन करून सोशल डिस्टंसिंग च्या माध्यमातून अध्यापनाचे सत्र कायम ठेवले. मात्र यात खरे ज्ञानदानाचे मंदिर उघडण्यात आले नाही. ते मंदिर आजही विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत आहे. अनेक जणांनी मंदिरे उघडावी म्हणून आंदोलने केली मात्र कोणत्याही नेत्यांनी किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी एकदाही शाळा उघडण्यास संदर्भात काळजी घेतलेली नाही. आता केव्हा वेक्सिंन येईल ?विद्यार्थ्यांना ति लस कधी मिळेल? मिळाली तर पालक आपल्या पाल्याला पाठवण्यास तयार होतील का? झाले तर शिक्षक त्यांना अध्यापन करण्यासाठी तयार होतील का? असे अनेक प्रश्न येणाऱ्या काळात उपस्थित राहतील. विद्यार्थी शाळा केव्हा भरेल या प्रतीक्षेत असायचा मात्र परिस्थितीने आज असा घाट घातला आहे शाळा विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत आहे,कि काय असे वाटत आहे.


आता दिवाळीनंतर शाळा सुरू होईल विद्यादानाचे कार्य पूर्वीप्रमाणे चालू होईल अशी आशा धरूया.


Post a Comment

0 Comments