वडार समाजाच्या अमरण उपोषणकर्त्यांना रिपाइं(आ) तालुका देवणी च्या वतीने जाहीर पाठींबा
देवणी:{शहर प्रतिनिधी/विक्रम गायकवाड}रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ),ता.देवणी जि. लातूर च्या शिष्टमंडळाने आज देवणी नगर पंचायती समोर सुरू असलेल्या उपोषणांस रिपाइं(आ) तालुका देवणी च्या वतीने जाहीर पाठींबा देण्यात आला आणि या शिष्टमंडळाने देवणी नगर पंचायत चे विद्यमान नगर अध्यक्षांची भेट घेऊन सदरील प्रकरणाविषयी चर्चा करण्यात आली या प्रकरणात योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याचे आश्वासन नगर अध्यक्षांनी दिले,या प्रकरणातील दोषींवर कडक कार्यवाही करण्यात यावी व वडार समाज बांधवांना न्याय मिळवून द्यावा अन्यथा रिपब्लिकन स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असे लेखी निवेदन देवणी नगर पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले,यावेळी तालुका अध्यक्ष विलासजी वाघमारे,युवा तालुका अध्यक्ष गणेशभाऊ कांबळे दवणहिप्परगेकर,मातंग आघाडी चे जिल्हा अध्यक्ष उत्तम रणदिवे,ता.ग्रामीन अध्यक्ष रोहित डोंगरे आदी रिपाइं(आ)चे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments